वॉटरगेट :लोकशाहीची मृत्युघंटा!
पैसा हा कोणत्याही चोरी किंवा दरोड्यामागचा मुख्य उद्देश असतो. कधी सोने नाणे तर कधी प्रॉपर्टी चे पेपर्स यासाठीच दरोडे पडतात. वॉशिंग्टन पोस्टचा पत्रकार बॉब वूडवर्डस जेव्हा १८ जून १९७२ च्या दिवशी नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामकाजाचे रिपोर्टींग करण्यासाठी न्यायालयात हजर झाला तेव्हा त्यालाही तशीच अपेक्षा होती. वॉटरगेट कॉम्प्लेक्स-वॉशिंग्टन डी सी कारण आदल्या दिवशी म्हणजेच १७ जून १९७२ रोजी वॉशिंग्टनच्या वॉटरगेट कॉम्प्लेक्स मधील डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या (DNC) मुख्यालयावर दरोडा पडला होता. दरोड्यातील सर्व पाच दरोडेखोर रंगेहाथ सापडले होते, आणि त्या सर्वाना दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात न्यायाधीशांनी जेव्हा 'आपला व्यवसाय काय?' असा प्रश्न त्या दरोडेखोरांना उद्देशून विचारला तेव्हा 'मी पूर्वीचा CIA चा अधिकारी असल्याचे' त्यातील एकाने अभिमानाने सांगितले. आतापर्यंत शांतपणे कामकाज पाहत असलेला वूडवर्ड्स या उत्तराने एकदम चपापला. त्याच्या डोक्यात अचानक चक्रे फिरु लागली आणि काही गोष्टी त्याला स्पष्ट होऊ लागल्य...