Posts

Pratisarkar:- A parallel government that threw away the British Raj

Image
8 August 1942 was a watershed moment in Indian freedom struggle, thousands of people stormed Gowalia Tank Stadium for Congress meet. Mahatma Gandhi gave a mantra ' Karenge ya Marenge ' i. e. do or die. Later that night Gandhi,Nehru, Patel, Rajendra Prasad and almost entire Congress leadership was put behind the bars. The freedom movement suddenly lost all its leaders and maybe this leaderless situation gave birth to thousands of local leaders who had got a clear message that this is the final battle for freedom and they have to do or die for it. Protests erupt all over the country after 'Quit India' call Congress under the leadership of Mahatma Gandhi always believed in nonviolence and peaceful demonstrations for demand of freedom. The means were as important as the end in itself but it was about to change a little from this moment . In Ballia, Uttar Pradesh a parallel government was formed under the leadership of Chittu Pandey;  in Bhagalpur, Bih

Book Review: The diary of a young girl

Image
                  Reading the diary of a young girl by Anne Frank is a pleasing experience. Second World War has always fascinated me, for its inhuman wars to some examples of blooming humanity, from its number of deaths to the stories of survival and from ‘thousand year Reich’ rant to ‘we will fight on beaches’ rhetoric. It was perhaps the most difficult period for a man to walk on earth in the history of human existence. Anne Frank’s diary is another great story of war era, despite its ending in tragedy as we know today; it reminds us of Anne’s presence here around us today.   Because what I know now about the diary is its not a great piece of art because it has an account of life in second world war, but also for the literary excellence shown by a thirteen year old girl, who tells us her story of life in hiding, a life of a Jew, and makes it so interesting as you almost reach to those streets of Amsterdam and feel it. Anne Frank One question strikes you as you finish th

गोळवलकर गुरुजी आणि संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन!

Image
              छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही मराठी माणसाच्या स्वाभीमानाची आणि गर्वाची दोन अग्रं आहेत. 'छत्रपती शिवाजी महाराज की' म्हटलं कि 'जय!' असं ज्याच्या तोंडातून आपोआप बाहेर येतं तो 'मराठी' माणूस. अशी एक सोपी मराठी माणसाची व्याख्या काही वर्षांपूर्वी एका बड्या नेत्याने केली होती जी खरीही आहे. शिवाजी आणि संभाजी महाराज हा महाराष्ट्राच्या मनावर आपोआप होत जाणारा संस्कार आहे. त्यांच्यावर प्रेम करायला कुणाला शिकवायला लागत नाही,ना त्यासाठी इतिहासाची पुस्तकं वाचावी लागतात, आपोआप प्रेम जडत जाते. आणि आज एकविसाव्या शतकातही लाखो करोडो जनतेने त्यांना देवत्वाच्याही वर नेवून ठेवले आहे. 'राजा कसा असावा?' तर तो शिवाजी आणि संभाजी महाराजांसारखा आदर्श असावा हे पिढ्यानपिढ्या महाराष्ट्राच्या मनामनावर कोरलेलं असल्याने त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कसलाही किंतु त्यांच्या मनाला कधीच शिवत नाही. मग जेम्स लेन किंवा मल्हार रामरावासारख्या अवलादींनी त्यांच्यावर कितीही डाग पाडायचा प्रयत्न करो, माझे दोन्ही राजे सूर्यासारख्या डोळे दिपवणाऱ्या तेजाने नेहमीच त्यांच्या

वॉटरगेट :लोकशाहीची मृत्युघंटा!

Image
           पैसा हा कोणत्याही चोरी किंवा दरोड्यामागचा मुख्य उद्देश असतो. कधी सोने नाणे तर कधी प्रॉपर्टी चे पेपर्स यासाठीच दरोडे पडतात. वॉशिंग्टन पोस्टचा पत्रकार बॉब वूडवर्डस जेव्हा १८ जून १९७२ च्या दिवशी नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामकाजाचे रिपोर्टींग करण्यासाठी न्यायालयात हजर झाला तेव्हा त्यालाही तशीच अपेक्षा होती. वॉटरगेट कॉम्प्लेक्स-वॉशिंग्टन डी सी  कारण आदल्या दिवशी म्हणजेच १७ जून १९७२ रोजी वॉशिंग्टनच्या वॉटरगेट कॉम्प्लेक्स मधील डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या  (DNC) मुख्यालयावर दरोडा पडला होता. दरोड्यातील सर्व पाच दरोडेखोर रंगेहाथ सापडले होते, आणि त्या सर्वाना दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात न्यायाधीशांनी जेव्हा 'आपला व्यवसाय काय?' असा प्रश्न त्या दरोडेखोरांना उद्देशून विचारला तेव्हा 'मी पूर्वीचा CIA चा अधिकारी असल्याचे' त्यातील एकाने अभिमानाने सांगितले. आतापर्यंत शांतपणे कामकाज पाहत असलेला वूडवर्ड्स या उत्तराने एकदम चपापला. त्याच्या डोक्यात अचानक चक्रे फिरु लागली आणि काही गोष्टी त्याला स्पष्ट होऊ लागल्या. त्याच्या लक्षात आले कि हा

इवो जिमा--नरकातले दुःस्वप्न!

Image
                 हा फोटो आपण पूर्वीच पाहिलाय. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाला तो व्हाट्सएप्प आणि फेसबुक वर शेअर होत असतो. किंबहुना सर्वच देशांमध्ये असा तो विशिष्ट दिवशी झेंडे बदलून फिरत असतो, तो फोटो आहेही तसाच काळजाला भिडणारा. सहा तरुण एका पर्वताच्या टोकावर आपल्या देशाचा झेंडा रोवत आहेत, ते विजयाचे प्रतीक आहे. पण हा झेंडा कोणाचा आहे? ते सहा तरुण कोण? तो स्टुडिओ मध्ये तरी काढलेला नाही? जेवढा हा फोटो अप्रतिम आहे तेवढाच त्यामागचा इतिहास रोमांचक आहे, जेवढा हा फोटो सुंदर आहे तेवढीच रक्ताची किंमत त्यासाठी मोजलेली आहे.युद्धातले काही क्षण अमर होतात पण युद्ध भयानकच असते.                 स्टॅलिनग्राड च्या लढाईनंतर युरोपातील युद्धाचे वारे फिरले होते. रशियाने पूर्वेकडून तर नॉर्मंडीत उतरलेल्या दोस्त सेनेने पश्चिमेकडून मुसंडी मारत जर्मनीला जेरीस आणले होते. त्याचवेळी पॅसिफिक मधल्या युद्धात गुडालकॅनाल, ग्वाम, पापुआ न्यू गिनी, फिलिपाइन्स जिंकत अमेरिकन फौजा जपानला मागे सरकवत होत्या. थायलंड, मलेशिया, सिंगापूरही आता दोस्त सैन्याने काबीज केले होते. १९४५ साल येता येता दुसऱ्या महायुद्धाचा निकाल स्पष

स्टॅलिनग्राड :मातृभूमीची हाक!

Image
                 "हे तिसरं राईश (जर्मन राज्य) एक हजार वर्षे टिकेल" अशी भविष्यवाणी हिटलरने ४ मे १९४१ ला जर्मन राईशस्टॅग मध्ये केली होती. ज्यू आणि बोल्शेव्हिजम चा नायनाट करून संबंध युरोप एका जर्मन झेंड्याखाली आणायचे दैवी कार्य त्याला करायचे होते. ३१ जानेवारी १९३३ ला सत्ता हाती घेतल्यापासून पराभव किंवा माघार हे शब्द कधी जर्मनीत उच्चारलेच गेले नव्हते. प्रथम धमकी देऊन आणि ती न ऐकल्यास प्रत्यक्ष कृती करून हिटलर ने अनेकांना नमवले होते. ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया, पोलंड, बेल्जीयम, नेदरलँड, नॉर्वे, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, युगोस्लाव्हिया, ग्रीस, आणि कित्येक देश जर्मनीच्या 'Blitzkrieg' पुढे (Lightning Attack) पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले होते. फ्रान्ससारखा देश ज्याने पहिल्या महायुद्धात चार वर्षे खंदकात बसून चिवट प्रतिकाराने आपल्या देशाचा ४  मे  १९४१:एक हजार वर्षाच्या राईश ची भविष्यवाणी  स्वाभिमान राखला होता, तोच फ्रान्स हिटलरच्या तडाख्यात एक महिनाही टिकला नाही. फ्रान्स खिशात टाकलेल्या आत्मविश्वासाने भरलेल्या हिटलरने 'एक हजार वर्षाची' भाषा का बोल