धर्मस्वच्छता आणि हत्या!
तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असा लहानपणी ऐकलेलं आणि नंतर 'तुकाराम' या चित्रपटात देखील पाहिलेलं. त्यांना पुष्पक विमान येउन घेऊन गेलं! या घटनेच्या सत्यासत्यातेबद्दलशंका होतीच पण विषय श्रद्धेचा असल्याने तसाच सोडून दिला. पण मग अशाच एका दिवशी तुकाराम महाराज अचानक वैकुंठाला गेले, तेही कायमचे, म्हणजेच गायब झाले कसे आणि का? हा प्रश्न होताच. परवाच्या मंगळवारी सकाळी पुण्यात डॉ नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या घालून हत्या झाली क्षणभर सुन्न झालो आणि मग पक्कंच झालं की पाऊणे चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचाही 'दाभोलकर ' च झाला असणार, आणि वैकुंठाला गेले म्हनून आरोळ्या उठवल्या असणार, जो नाही म्हणेल तो अश्रद्ध! मग कोण कशाला नाही म्हणतोय! भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर सनातनी लोकांची हीच 'स्टाइल' राहिलेली आहे. ज्ञानेश्वर फुले रानडे आंबेडकर यांच्यावरही सनातन्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरून पहिलेच आहेत साम-दाम-दंड-भेद कुठे आणि कुणा व...