स्टॅलिनग्राड :मातृभूमीची हाक!
"हे तिसरं राईश (जर्मन राज्य) एक हजार वर्षे टिकेल" अशी भविष्यवाणी हिटलरने ४ मे १९४१ ला जर्मन राईशस्टॅग मध्ये केली होती. ज्यू आणि बोल्शेव्हिजम चा नायनाट करून संबंध युरोप एका जर्मन झेंड्याखाली आणायचे दैवी कार्य त्याला करायचे होते. ३१ जानेवारी १९३३ ला सत्ता हाती घेतल्यापासून पराभव किंवा माघार हे शब्द कधी जर्मनीत उच्चारलेच गेले नव्हते. प्रथम धमकी देऊन आणि ती न ऐकल्यास प्रत्यक्ष कृती करून हिटलर ने अनेकांना नमवले होते. ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया, पोलंड, बेल्जीयम, नेदरलँड, नॉर्वे, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, युगोस्लाव्हिया, ग्रीस, आणि कित्येक देश जर्मनीच्या 'Blitzkrieg' पुढे (Lightning Attack) पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले होते. फ्रान्ससारखा देश ज्याने पहिल्या महायुद्धात चार वर्षे खंदकात बसून चिवट प्रतिकाराने आपल्या देशाचा ४ मे १९४१:एक हजार वर्षाच्या राईश ची भविष्यवाणी स्वाभिमान राखला होता, तोच फ्रान्स हिटलरच्या तडाख्यात एक महिनाही टिकला नाही. फ्रान्स खिशात टाकलेल्या आत्मविश्वासाने भरल...